नांदेड(प्रतिनिधी)-मांजरम ता.नायगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी एक लाख 95 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. हदगाव-उमरखेड रस्त्यावर एक जबरी चोरी झाली आहे. किनवट येथील आरामशीन-सरदारनगर रोडवर एक जबरी चोरी झाली आहे. स्नेहनगर पोलीस वसाहतीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे. या चार चोरी प्रकारांमध्ये एकूण 2 लाख 80 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
मांजरम येथे किराणा दुकान चालविणाऱ्या यादव प्रकाश हनुमंते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जुलैच्या सकाळी 10 ते 30 जुलैच्या पहाटे 3 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी मांजमर येथील त्यांच्या घराचे चैनल गेट उघडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाट चाबीने उघडून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 1 लाख 75 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. सोबतच गावातील अविनाश माळी पाटील यांची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 1 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. या प्रकरणाचा एक गुन्हा दाखल करत नायगाव पोलीसांनी गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बाचावार यांच्याकडे दिला आहे.
योगेश राजू यादव हे मध्यप्रदेशमधील राहणारे व्यक्ती आहेत. दि.30 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्यासुुमारास ते आणि इतर साक्षीदार ट्रक क्रमांक एच.बी.7752 घेवून हदगाव ते उमरखेड जाणाऱ्या रस्त्यावर जात असता साईमंदिराजवळ त्यांच्या ट्रक पंक्चर झाल्याने तो ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून कॅबीनमध्ये झोपले असतांना तीन अज्ञात दरोडेखोरांनी ट्रकच्या कॅबीनमध्ये घुसून त्यांना चाकूने मारहाण करून दुखापत केली. इतर साक्षीदारांना मारहाण केली. त्यांच्याकडील रोख 2500 रुपये आणि 10 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा 12500 रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक मोरे अधिक तपास करीत आहेत.
माणिक नारायण श्रीरामे हे 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास किनवट येथील आरामशीन ते सरदारनगर रस्त्यावर आपल्या मित्रासोबत जात असतांना कांही आरोपींनी त्यांच्या खिशातील 18 हजार रुपयांचा मोबाईल, त्यांच्या मित्राच्या खिशातील 5800 रुपयांचा मोबाईल आणि रोख 500 रुपये असा ऐवज लुटून नेला आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.
स्नेहनगर पोलीस वसाहतीतील अधिकाऱ्यांच्या कोयना या इमारतीत राहणाऱ्या सोनाली महादेव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जुलै रोजी रात्री 9 वाजेपासून ते 30 जुलैच्या पहाटे 8 वाजेदरम्यान कोयना इमारतीसमोर ठेवलेली त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.टी.5967 ही 49 हजार रुपयांची दुचाकी कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
दोन जबरी चोऱ्या, एक घरफोडी आणि एक दुचाकी चोरी ; 2 लाख 80 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास