नांदेड(प्रतिनिधी)-वायपना शिवार ता.हदगाव येथे दुचाकीवर जाणाऱ्या दोघांना खाली पाडून त्यांच्याकडील 2 लाख 50 हजार रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. निळा ता.जि.नांदेड येथील शेतातून 40 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. टाकळी ता.नायगाव येथून एका झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील 5 हजार 500 रुपयांचे मनीमंगळसुत्र चोरून नेण्यात आले आहे. तीन चोरी प्रकारामध्ये एकूण 2 लाख 97 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
भगवान पुंडलिक नरवाडे हे ऑईल मिलमध्ये मुनीम आहेत. दि.30 जुन रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास ते आणि त्यांचे सहकारी ऑईलमिलचे पैसे वसुली करून हदगावकडे परत येत असतांना सेवली ते वायपना (बु) जाणाऱ्या रस्त्यावर पुलाजवळ कांही दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावर लाल चटणी फेकली. मोटारसायकलला लाथ मारून खाली पाडले आणि त्यांच्याकडील 2 लाख 50 हजार रुपये रक्कम असलेली बॅग चोरुन नेली आहे. तामसा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक घुगे अधिक तपास करीत आहेत.
संतोष नागोराव कोकाटे हे प्राध्यापक आहेत. मौजे. निळा येथे त्यांचे शेत आहे. 16 जून 2021 ते 21 जून 2021 या दरम्यान शेताच्या आखाड्यातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले दोन ईलेक्ट्रीक वायर बंडल आणि 5 पीव्हीसी पाईप असा 40 हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. लिंबगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार अशेाक दामोदर अधिक तपास करीत आहेत.
बालाजी म्हैसाजी गंधकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जुलै रोजी रात्री 11 वाजता मौजे टाकळी येथे त्यांची आई घराच्या अंगणात झोपली होती. 30 जुलै रोजी पहाटे 3 वाजता त्यांना जाग आली तेंव्हा त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, मणीमंगळसुत्र व सोन्याची पाने असलेले त्यांचे गंठण 7500 रुपये किंमतीचे कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
2 लाख 50 हजारांची जबरी चोरी ; इतर दोन चोऱ्या; 2 लाख 97 हजारांचा ऐवज लंपास