नांदेड(प्रतिनिधी)-20 जुलै रोजी विक्की ठाकूर खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा जणांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
20 जुलै रोजी विक्की दशरथसिंह ठाकूर या युवकाचा खून गाडीपुरा भागात झाला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 176/2021 दाखल झाला होता. त्यानंतर प्रथम दोन महिलांना अटक झाली. सध्या त्या तुरूंगात आहेत. त्यानंतर नितीन जगदीश बिघानीया, दिगंबर टोपाची काकडे, मुंजाजी उर्फ गब्या, बालाजी धोंगडे, कृष्णा उर्फ किन्ना छगनसिंह परदेशी उर्फ ठाकूर आणि मयुरेश सुरेश कत्ते यांना अटक झाली होती. न्यायालयाने त्यांना आज पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आज पोलीस कोठडी संपल्यावर समोर आलेल्या तथ्यानुसार या प्रकरणातील फिर्यादी सुरज खिराडेने आपला पुरवणी जबाब दिला होता. त्यानुसार मुसलमान व्यक्तीसारखा पोशाख धारण केलेले कोण-कोण होते या संदर्भाने सविस्तर माहिती दिली. पुर्वीच्या पोलीस कोठडीत पोलीसांनी दोन दुचाकीवर पाच जण होते असा जबाब खिराडेचा होता त्यात सुधारणा झाली असून तीन दुचाकीवर सात जण होते असे नवीन पुरवणी जबाबात सुरज खिराडेने म्हटले आहे.
पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडून पोलीसांनी दोन गावठी कट्टे आणि एक खंजर आणि खून करतांना परिधान केलेले कपडे जप्त केले आहे. आज पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम यांनी पाच आरोपींना न्यायालयात हजर केले. सरकारी ऍड.मोहम्मद रजियोद्दीन यांनी या प्रकरणातील इतर सत्य शोधण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. या विनंतीला प्रतिसाद देत न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी या पाच जणांना दोन दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
20 जुलै रोजी विक्की ठाकूरचा खून झाल्यानंतर अतिरिक्त कामाच्या बोजाने इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे आजारी पडले. सध्या ते दवाखान्यात आहेत. दवाखान्यात असतांना सुध्दा आपल्या पोलीस ठाण्याची चिंता त्यांना दिसते. त्यांनी केलेली मेहनत भरकटू नये यासाठी त्यांची दिसलेली मानसिकता असे सांगत होती की, आपल्यावर असलेली जबाबदारी अत्यंत महत्वपूर्ण आहे. पण शारिरीक परिस्थिती बिघडल्याने ते दवाखान्यात असतांना सुध्दा आपल्या पोलीस ठाण्यातील कामकाजाची चिंता असे सांगते की, “वही गगन भी छुता है जिसका जमीं से नाता है, मिट्टीका पुतला ही उड कर चॉंद पर ध्वज फहराता है, बढी रौशनी है जरुर पर उस में है वो बात कहॉं, नन्हासा वो दिया देखी ऐ तुफां सेे लढ जाता है’.
विक्की ठाकूरच्या मारेकऱ्यांना दोन दिवस पोलीस कोठडी वाढली