नांदेड(प्रतिनिधी)-वसमत येथून बंदुकीचा धाक दाखवून 87 हजार 600 रुपयांची रोख रक्कम लुटून दोन जण नांदेडकडे आले आहेत. राज्यपालांच्या व्यस्त दौऱ्यात नांदेड पोलीसांना या दोन दरोडेखोरांना शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या एका सीसीटीव्ही फुटेजनुसार वसमत येथे एका निर्मनुष्य रस्त्यावर दोन जण थांबलेले दिसतात. त्यांच्यासमोर असलेल्या एका इमारतीतून एक व्यक्ती हातात बॅग घेवून येतो आणि तो आपल्या दुचाकी गाडीवर बसण्यासाठी तयारी करत असतो. दरम्यान त्याची वाट पाहत थांबलेले दोन जण आपली दुचाकी चालू करून तिथपर्यंत येतात आणि दुचाकीवरील मागचा माणुस खाली उतरून बंदुक दाखवून त्या माणसाच्या हातातील बॅग घेवून दोघे जण दुचाकीवर बसून पळून जातात. ते दोघे नांदेडकडे आले आहेत. असे सांगून नांदेड पोलीसांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. अशी माहिती नांदेड पोलीसांना देण्यात आली. त्यामुळे राज्यपालांच्या व्यस्त दौऱ्यात नांदेड पोलीसंाना या दरोडेखोरांना शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोडेखोरांच्या हातात दिसते ती बंदुक खेळण्याची असेल असे वाटते. त्यांनी कोणतीही गोळी न चालवता फक्त बंदुक दाखवून 87 हजार 600 रुपये लुटले आहेत. ज्या ठिकाणी दरोडा झाला त्या ठिकाणापासून 100 फुटावरच वसमतचा मुख्य रस्ता दिसतो. त्यावरून बस गाड्या जातांना येतांना दिसत होत्या. दरोडेखोरांची या सीसीटीव्ही फुटेजमधील हालचाल पाहिल्यावर त्यांना हा व्यक्ती पैसे घेवूनच येईल याची बहुदा माहिती होती असे दिसते.