नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या वडीलानंतर भावासोबत फसवणूक करणाऱ्या दोघांविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सुनिल अण्णाराव सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील अण्णाराव परसराम सुर्यवंशी आणि आई रत्नमाला अण्णाराव सुर्यवंशी या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मालकीचे एटीएम कार्ड, बॅंकेचे चेकबुक, पेन्शन बुक आणि अनेक महत्वाची कागदपत्रे सोबत 25 तोळे सोने आणि 7 ते 8 लाख रुपये रोख रक्कम हा सर्व आई-वडीलांच्या ताब्यात असलेला ऐवज भाऊ संजय अण्णाराव सुर्यवंशी आणि लता रविंद्र पाटील या दोघांनी अपहार करून विश्र्वासघात केला आहे. ही तक्रार न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाने 6 ऑगस्ट रोजी भाग्यनगर पोलीसांनी दिलेल्या आदेशानुसार भाग्यनगर पोलीसांनी संजय अण्णाराव सुर्यवंशी आणि लता रविंद्र पाटील या दोघांविरुध्द भारतीय दंडसंहितेच्या कलम 379, 404, 405 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 262/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्या तपास पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख हे करीत आहेत.
आई वडीलांची संपत्ती हडप करणाऱ्या दोघांविरुध्द पुत्राने दिली तक्रार