ययाती मुंढे मृत्यू प्रकरणात प्रविण ओमप्रकाश पोकर्णा यांनी मागितला अटकपुर्व जामीन

नांदेड(प्रतिनिधी)-ययाती मुंढेने कर्जाला कंटाळून 5 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. प्रेताचा पंचनामा करतांना कर्ज देणाऱ्यांच्या नावाची यादी असलेला कागद सापडला. 8 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला. याती एक प्रविण ओमप्रकाश पोकर्णा यांनी 10 ऑगस्ट रोजी नांदेडच्या न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला. या अर्जाची पुढील सुनावणी 13 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे. किती घाई !
दि.5 ऑगस्ट रोजी श्रीनगरनगर भागातील ययाती मुंढे या युवकाने आपल्याच घरात गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपवली. पोर्स्टमार्टम रुममध्ये पोलीस प्रेताचा पंचनामा करीत असतांना ययातीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात लिहिल्याप्रमाणे 9 लोकांच्या कर्जाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे असे लिहिले आहे. त्यात एक नाव प्रविण पोकर्णा असे होते. 8 ऑगस्ट रोजी ज्योती ययाती मुंढे यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी 9 जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 263/2021 भारतीय दंडसंहितेच्या कलम 306,34 नुसार दाखल केला.
48 तास पुर्ण होण्याअगोदर दि.10 ऑगस्ट रोजी प्रविण ओमप्रकाश पोकर्णा यांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी जामीन अर्ज क्रमांक 621/2021 दाखल केला. हा अर्ज दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांच्या समक्ष चालणार आहे. या अर्जावर पोलीसांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि युक्तीवाद मांडण्यासाठी पुढील तारीख 13 ऑगस्ट 2021 निश्चित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *