शहरात रात्री 8 वाजता 7 लाखांची लूट 

दोन दरोडेखोर;पिस्तूल आणि तलवारीचा धाक

नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील गोकूळनगर भागात दोन दरोडेखोरांनी एका व्यापाऱ्याला पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून सात लाखांची रोकड लुटून नेल्याचा भंयकर प्रकार घडला आहे.

          शहरातील गोकूळनगर भागात हनूमान अग्रवाल या व्यापाऱ्याची सिमेंट दुकान आहे. बुधवारी रात्री 8 वाजता अग्रवाल हे आपली दुकान बंद करत असतांना शटर ओढले तेव्हा त्यांनी 7 लाख रुपये रोख रक्कम असलेली बँग सोबत ठेवली. तेव्हढ्यातच दोन दरोडेखोर आले. त्यातील एका जवळ तलवार आणि एका जवळ पिस्तूल होती.शस्त्रांचा धाक दाखवून सात लाखांची रोकड घेवून दरोडेखोर पळून गेले.
          घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार गोकूळनगरला पोहचले आहेत.पण दरोडेखोरांना पोलीसांची भिती नाही आसेच दिसते.ती तयार करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *