उमरीत 23 वर्षीय युवकाचा खून 

नांदेड(प्रतिनिधी)-निमटेक ता.उमरी येथे सहा जणांनी एका 23 वर्षीय युवकाला केलेल्या मारहाणीनंतर जीवघेणा हल्ला या सदरात उमरी पोलीसांनी 11 ऑगस्ट रोजी  गुन्हा दाखल केला आहे. दुर्देवाने हा मारहाण झालेला युवक 12 ऑगस्ट रोजी मरण पावला त्यामुळे आता खूनाचे कलम वाढणार.


कलावतीबाई सुरेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा महेश सुरेशराव पाटील (23) हा 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजेच्यासुमारास शेतातून घराकडे असतांना आरोपींनी त्याला रोखून बॅनर लावल्याच्या कारणावरून बॅटने मारहाण केली. सध्या जखमी महेश पाटीलवर निझामाबाद येथे उपचार सुरू आहे. उमरी पोलीसांनी खुशाल मोहनराव पाटील, आदित्य खुशाल पाटील, सुनिता खुशालराव पाटील, त्र्यंबक माधवराव पाटील, शैलेश त्र्यंबक पाटील, मारोती उर्फ मनोज अशोक पाटील या सर्वांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा क्रमांक 182/2021 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे अधिक तपास करीत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जखमी झालेला युवक महेश पाटील 12 ऑगस्ट रोजी सकाळी निजामाबाद येथे उपचारादरम्यान मरण पावला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 302 वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *