एक जबरी चोरी, एक घरफोडी, तीन दुचाकी चोरी, एक मोबाईल चोरी आणि वृध्द महिलेची फसवणूक ; 3 लाख 57 हजार 499 रुपायांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात 7 लाख 70 हजार रुपयांची जबरी चोरी झाली. त्यासोबतच महाराणा प्रताप चौकात एक जबरी चोरी झाली. शिव कल्याणनगर लोहा येथे एक घरफोडी झाली. मदनापूर ता.माहूर, चिखवाडी भोकर आणि इंदिरानगरा लोहा येथे तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. विसानगरच्या पार्किंगमधून एक मोबाईल चोरीला गेला आहे. तसेच बिलोली येथील जुन्या बसस्थानकात एका वृध्द महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. या सर्व प्रकारांमध्ये 3 लाख 57 हजार 499 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
वैभव एकनाथराव पवार या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार महाराणा प्रताप चौक येथे दि.11 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजता दोन अज्ञात इसमांनी त्याला खाली पाडून त्याची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.यु.9556 ही 50 हजार रुपये किंमतीची गाडी चाकुचा धाक दाखवून चोरून नेली आहे. विमानतळ पाोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके हे अधिक तपास करीत आहेत.
शिवकल्याणनगर लोहा येथे राहणारे मुख्याध्यापक विलास लिंगोजीराव नागेश्र्वर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 7 यावेळेत ते शाळेला गेले होते आणि त्यांची पत्नी नातेवाईकांकडे बाहेरगावी गेली होती. या संधीचा फायदा घेवून कोणी तरी चोरट्यांनी त्यांचे घरफोडून कपाट फोडले आणि 35 हजार रुपये रोख चोरले. तसेच लोखंडी कपाट तोडून त्यातून 1 लाख 39 हजार 500 रुपयांच्या किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे मिळून 1 लाख 74 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मारोती सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
मदनापुर येलि गजानन नागोराव डाखोरे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.क्यु.7069 ही 16 हजार रुपये किंमतीची गाडी वाई ते मदनापुर रस्त्यावरील कारळगाव फाट्याजवळून 10 ऑगस्टच्या सायंकाळी 6.30 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. सिंदखेड पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मडावी अधिक तपास करीत आहेत.
तलाठी नामदेव ग्यानोबा मुळेकर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.आर.9874 ही 50 हजार रुपये किंमतीची गाडी 25-26 जुलैच्या रात्री चिखलवाडी भोकर येथून चोरीला गेली आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कऱ्हाड अधिक तपास करीत आहेत.
प्रदीप रामचंद्र शेंबडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10-11 ऑगस्टच्या रात्री इंदिरानगर लोहा येथून त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 डी.9674 ही 20 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बगाडे अधिक तपास करीत आहेत.
दि.5 ऑगस्ट रोजी शेख रिजवान शेख इब्राहिम हे नळफिटींगचे काम करून स्टेडीयम पार्किंगमध्ये झोपले असतांन त्यांच्या खिशातील 16 हजार 499 रुपयांचा मोबाईल दुपारी 2 वाजता चोरीला गेला. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार गोटमवार हे करीत आहेत.
एका आठवड्यात दुसऱ्यांदा जुने बसस्थानक बिलोली येथे दुसऱ्या एका वृध्द महिलेची फसवणूक झाली आहे. साराबाई भृगूशाली आकुलवार (70) रा.तमल्लूर ता.देगलूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 1.30 वाजेदरम्यान जुने बसस्थानक बिलोली येथे तिला एका भामट्याने 60 वर्षाचे पैसे दुप्पट करून देतो म्हणून तिच्या कानातील एक तोळा सोन्याचे कुंडल किंमत 30 हजार रुपयांचे विश्र्वासघात करून घेवून गेला आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक सय्यद हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *