नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील डॉक्टर पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहिती आधारे एक अग्निशस्त्र व जीवंत काडतुस पकडले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेतील डॉक्टर पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर चव्हाण यांनी आपल्या गुप्त माहितीदाराकडून माहिती काढून शेख अमिर शेख लईक यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या विचारपुसनंतर त्याने आपल्या घरात लपवून ठेवलेले गावठी पिस्टल व दोन जीवंत काढतूस आणि एक मोठी तलवार पोलीसांना काढून दिली. शेख अमिरने पिस्टल आणि दोन जीवंत काढतूस एक महिन्यापुर्वी एक विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून 49 हजार रुपयांना खरेदी केली असल्याची माहिती पोलीसांना दिली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 आणि 4/25 नुसार शेख अमिर शेख लईक विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात पिस्टल आणि दोन जीवंत काढतूस पकडणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सलीम बेग, पोलीस अंमलदार मारोती तेलंगे, बालाजी यादगिरवाड, पद्मसिंह कांबळे, बालाजी तेलंग, रुपेश दासरवाड, शंकर केंद्रे यांचे कौतुक केले आहे.