नांदेड(प्रतिनिधी)-गोकुळनगर भागात घडलेल्या लुट प्रकरणात 7 लाख 70 हजार रुपये बळजबरीने चोरुन नेण्यात आले आहे. प्रसार माध्यमांनी पोलीसांच्या कांही शंकासह बातम्या प्रसिध्द केल्या आहेत. पण पोलीसांचे कामच शंकेपासून सुरू होते याची जाणिव आवश्यक आहे.
काल दि.11 ऑगस्ट रोजी रात्री गोकुळनगर भागातील बालाजी ट्रेडर्स या दुकानातून त्या दुकानाचा एक नोकर पैशाने भरलेली सुटकेस घेवून बाहेर येण्याच्या तयारी असतांना दोन जण आले आणि त्याला मध्ये ढकलून त्याच्याकडून 7 लाख 70 हजार रुपये रक्कम असलेली सुटकेस शस्त्राच्या धाकावर बळजबरीने हिसकावून घेतली. या दुकानाचे मालक हनुमानदास अग्रवाल हे आहेत. बालाजी ट्रेडर्स या दुकानात सिमेंटचा व्यवसाय चालतो. दररोजप्रमाणे नोकराच्या हातानेच पैसे घरी पोहचवले जातात ही या दुकानात होणारी रोजची प्रक्रिया आहे. दरोडेखोरांनी पैशांची बॅग लुटल्यानंतर पुन्हा शर्टर लावून पळून गेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते त्याप्रमाणे तीन जण होते. पोलीसांना शंका येत आहे. या शब्दांसह प्रसारमाध्यमांनी या बाबत बातम्या प्रसिध्द केल्या आहेत. पण पोलीसांचे काम शंकेपासूनच सुरू होते याची जाणिव आवश्यक आहे. लुटीची घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, शिवाजीनगरचे आनंदा नरुटे यांच्या अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदार या घटनेबाबत आपल्या पध्दतीने शोध घेत आहेत.
7 लाख 70 हजारांच्या लुट प्रकरणात पोलीसांचे काम योग्य शंकेपासूनच सुरू