नांदेड (प्रतिनिधी)-11 डिसेंबर रोजी रात्री श्रीनगर भागात झालेल्या गोळीबार प्रकरणात तक्रारदाराने संशयित आरोपी म्हणून नाव दिले आहे. मागील इतिहास आठवला तर संशयित आरोपीच्या बहिणीला गोळीबार प्रकरणातील फिर्यादीने त्रास दिल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे.
11 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास श्रीनगर भागातील अनिकेत उर्फ सोनू अशोक कल्याणकर यांच्या घरासमोर एका दुचाकीवर दोन जण आले त्यावेळी अनिकेत घरासमोर थांबले होते. त्यातील एका सोनूभाई असा आवाज देवून त्यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला अशी तक्रार अनिकेत कल्याणकरने दिली आहे. या तक्रारीत संशयित आरोपी म्हणून मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे आणि त्याचा एक 25 ते 30 वयोगटातील साथीदार असे दोन नाव लिहिलेले आहेत.
याबाबत भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा क्र.268/2021 दाखल केला आहे. ज्यामध्ये भारतीय दंडसंहितेची 307 आणि 34 या कलमासह 3/25 ही भारतीय हत्यार कायद्याची कलमे जोडण्यात आली आहेत.
संशयित आरोपी म्हणून नाव दिलेल्या गोलू मंगनाळे यांच्या बहिणीला झालेल्या त्रासाचा अभिलेख अनिकेत उर्फ सोनू कल्याणकरच्या विरोधात आहे. त्यावेळेसच्या प्रकरणात सोनू कल्याणकरला बरेच दिवस तुरुंगात राहण्याची वेळ आली होती. आणि आज झालेल्या हल्ल्यात त्याने गोलू मंगनाळे यांचे संशयित म्हणून नाव लिहिले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी.भोसले हे करत आहेत.