नांदेड(प्रतिनिधी)- राहुल गांधी विचार मंचच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी अंकुश किशोर जोंधळे यांची निवड करण्यात आली आहे.
राहुल गांधी विचार मंचचे अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडूरंग वाघमारे यांनी अंकुश किशोर जोंधळे यांना नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिले. नियुक्ती पत्र देताना कॉंग्रेसचे स्वयंरोजगार सेल प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे पाटील, महिला कॉंग्रेस प्रदेश सचिव सरोज मसलगे पाटील, राहुल गांधी विचार मंच महाराष्ट्र प्रभारी दिपाली मिसाळ, महाराष्ट्र समन्वयक हरजिंदरसिंघ संधू यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नियुक्ती झाल्यानंतर कॉंग्रेस पक्ष वाढविण्यासाठी मी भरपूर मेहनत घेईल असे अंकुश जोंधळे यांनी सांगितले,
राहुल गांधी विचार मंचच्या जिल्हाध्यक्षपदी अंकुश जोंधळे