नांदेड,(प्रतिनिधी)-माहूर तालुक्यामध्ये चोरीचे व गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर अंकुश मिळवण्यासाठी व आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवादरम्यान पोलिसांना एक मदत म्हणून सिंदखेड पोलीस ठाणे अंतर्गत अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई बाजार येथे सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी पोलीस उपमहानिरीक्षक, निसार तांबोळी, परिक्षेत्र नांदेड, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे व उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली वाई येथील तरुणांना घेऊन ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली,निवड करण्यात आलेल्या तरुणांना पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस मित्र सिम्बॉल असलेला पांढरा टी-शर्ट काळा पॅन्ट, व पोलीस मित्र असलेला ओळखपत्र देण्यात आले या ग्रामसुरक्षा दलामध्ये वाई येथील एकूण तेवीस तरुणांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये शेख अन्नू, शुभम कटकमवार, रुपेश मोरे, शेख वाजिद, सुमेध खडसे, राहुल पंजाबराव टोके,शेख साबीर, शेख जावेद, शेख रफीक, जावीद बहादुर,सत्तार गुलजार,सतीश मेश्राम, राजू किनाके, इरफान हरून, शेख अप्पू, शेख निसार, शेख अखिल, आदी तरुणांची निवड करण्यात आली आहे. दि.१५ ऑगस्ट रोजी रात्री १२:०० ते सकाळी ४:०० पर्यंत गावामध्ये गस्ती करत असतांना पोलीस मित्र व पोलीस कर्मचारी.
