नांदेड(प्रतिनिधी)-8 फेबु्रवारी 2021 रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणमध्ये एका व्यक्तीने आपली 12 लाख रुपये किंमतीची हायवा जबरदस्तीने नेल्याबाबत दिलेल्या अर्जावर आज 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला तरीपण त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही असे त्या अर्जदाराने सांगितले आहे.
येळी ता.लोहा येथील गोविंद दत्तराम ढगे यांनी दि.8 फेबु्रवारी रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणमध्ये अर्ज दिला की, त्यांची हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 बी.ई.3623 ही दिगंबर रघुनाथ करडीले रा.नागापूर ता.जि.नांदेड याने बळजबरीने नेली आहे. 3623 क्रमांकाची गाडी गोविंद दत्तराम ढगे आणि रामदास पांडूरंग खानसोळे यांच्या भागिदारीतील होती. रामदासकडे दिगंबर करडीलेचे कांही पैसे देणे आहेत. त्यामुळे त्याने 3623 क्रमांकाची गाडी 2 फेबु्रवारी 2021 रोजी लातूरफाटा येथून बळजबरीने घेवून गेली आहे. मी दिगंबर करडीले यांना माझी गाडी का आणली अशी विचारणा केली तेंव्हा ही गाडी रामदासचीच आहे गाडी परत पाहिजे असेल तर पैसे आणून द्यायला सांग नाहीतर मी गाडी भंगार मध्ये विकून टाकेल. म्हणून दिगंबर रघुनाथ करडीलेविरुध्द कायदेशीर कार्यवाही करावे असा या अर्जात मजकुर लिहिलेला आहे.

आज दि.17 ऑगस्ट रोजी 8999868941 या क्रमांकावरून गोविंद दत्तराम ढगे यांनी कॉलकरून माहिती दिली की, सहा महिने झाले पण नांदेड ग्रामीण पोलीस मी दिलेल्या अर्जावर कांही एक कार्यवाही करत नाहीत. मी विचारणा करायला जेंव्हा-जेंव्हा गेला तेंव्हा करडीले गावाला गेले आहेत, आम्ही त्यांना बोलावणार आहोत असे सांगून गोविंद ढगेची बोळवण केली जात आहे. एखादा अर्ज आला असेल तर त्याची निर्गती करणे ही पोलीस विभागाची जबाबदारी आहे. पण 6 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला तरी अद्याप गोविंद ढगे यांच्या अर्जाची निर्गती मात्र नांदेड ग्रामीण पोलीसांनी केली नाही याचा जाब गोविंद ढगेने कोणाकडे विचारावा हा प्रश्न त्यांना पडला आहे.