नांदेड(प्रतिनिधी)-नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालयात 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.
भारताच्या अमृतमहोत्सवी स्वांतत्र्य दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, सचिव डॉ.कृ.म.जोशी कोषाध्यक्ष कैलासचंद्र काला, सहसचिव डॉ.वनिता जोशी, प्राचार्य डॉ.सुधिर शिवणीकर, उपप्राचार्य अजय संगेवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षीका सौ. रेणुका कुरूडे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ.अर्चना बावनकर, प्रा.आनंद कृष्णापुरकर, प्रा.क्षमा करजगावकर, प्रा.योगिता बंगाळे, प्रा.राजू कोटगिरे, प्रा.किशोर सुर्यवार, प्रा.तुकाराम काकडे यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
