नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार संजय अंबादासराव जोशी यांना स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलीस महासंचालकांच्यावतीने प्रदान करण्यात आलेले सन्मानचिन्ह त्यांना दिले.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार संजय अंबादासराव जोशी यांना त्यांच्या 29 वर्षाच्या पोलीस सेवेतील 200 पेक्षा जास्त बक्षीसे प्राप्त असल्यामुळे पोलीस महासंचालकांनी सन 2020 या वर्षाचे सन्मानचिन्ह त्यांना प्रदान केले.

15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह संजय जोशी यांना दिले. संजय जोशी यांनी आपल्या 29 वर्षाच्या सेवा काळात तामसा, कंधार, भाग्यनगर या पोलीस ठाण्यात काम केले आहे. सोबतच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड आणि नागरी हक्क संरक्षण विभाग नांदेड येथेही त्यांनी आपली सेवा दिली आहे. पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रदान झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.