छत्रपती संभाजी राजे यांनी पालकमंत्री अशोक चव्हाणांच्या गैरहजेरी खंत व्यक्त केली
नांदेड(प्रतिनिधी)-मी समाजासाठी राज्यभर मुक आंदोलन करण्याचे ठरविले असतांना त्यात प्रत्येकाचा सहभाग अपेक्षीतच केला होता. पण नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे आजच्या कार्यक्रमासाठी हजर राहिले नाहीत याचे दु:ख व्यक्त करून युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी खंत व्यक्त केली. आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला कोठेही जायचे नाही. तशी गरज आम्हाला शासनाने आणू नये असे छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले.
सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मुक आंदोलन आज छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या समक्ष झाले. यामध्ये युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले आले होते. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहु राजे यांच्या प्रतिमांचे पुजन करून युवराज संभाजी राजे भोसले यांनी समाज बांधवांसमोर बोलण्यास सुरूवात केली. मराठा समाजाने आपल्या आरक्षण मागणीसाठी भरपूर आंदोलने केली. पण त्यात दिलेल्या शब्दांना सरकार फिरले. हे सांगतांना छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी राज्यसभेमध्ये मला समाजाविषयी बोलण्याची संधी मागितल्यावर सुध्दा दिली नाही म्हणून मी खासदार की सोडायची तयारी केली. त्यावेळेस मला बोलण्याची संधी मिळाली होती हे सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण देवून त्या मागे लावलेले राजकारण आणि त्यातून आजपर्यंत प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मिळाली नाही त्यातील खाचा खळगा संभाजी राजे भोसले यांनी मांडल्या. आरक्षण देतांना राज्य सरकारची जबाबदारी आणि केंद्र सरकारची जबाबदारी याचे सविस्तर विवेचन करून आता काय करायला हवे. याबद्दल माहिती सांगितली. संभाजी राजे भोसले म्हणाले माझ्या विचाराप्रमाणे आजच्या आंदोलनामध्ये जनप्रतिनिधींनी बोलायचे होते. पण हे शक्य झाले नाही आणि मलाच बोलावे लागत आहे. याबद्दल जनप्रतिनिधींनी आपल्या समाजासाठी काय-काय कामे केली हे ऐकायला मी आलो होता पण ती परिस्थिती तयार झाली नाही.
झालेल्या आजपर्यंतच्या आरक्षण आंदोलनांमध्ये ज्या मागण्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आल्या. त्यातील मान्यता दिली नाही. पण मला एक 15 पानांचे पत्र शासनाने पाठविले असून त्याद्वारे काय-काय सांगितले आणि ते कसे समाजासाठी कामाचे नाही याचे विवेचन संभाजी राजे भोसले यांनी समाजासमोर केले. सरकारने पुणे, मुंबई लॉंगमार्च होणार नाही यासाठी काय करावे हे सांगत असतांना संभाजी राजे भोसले म्हणाले. आम्हाला पुढे काहीच आंदोलन करायचे नाही पण तशी वेळ आमच्यावर आणू नका आणि आमची ताकत दाखविण्याची गरज पडणार नाही असे काही तरी करा असे आवाहन सरकारला केले.
छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्यासमोर जवळपास जिल्हा परिषदेच्या इमारतीपर्यंत मराठा समाजातील लोकांना बसण्याची सोय करण्यात आली होती. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या नेतृत्वात सकाळी 6 वाजल्यापासून विविध रस्त्यांवरील वाहतुक वळती करून आंदोलकांना सहजरितीने कार्यक्रमस्थळी जाता येईल याची सोय करण्यात आली होती. आंदोलनात येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मराठा समाजाने विविध रस्त्यांवर फळांची सोय केली होती.
मराठा समाजाला आंदोलन करण्याची वेळ पुन्हा आणू नका-संभाजी राजे