नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी आनंदनगर मधील एका कॉफी शॉपवर कार्यवाही करून कॉफी शॉप मालकासह चार ग्राहकांवर कार्यवाही केली आहे.
विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार दोस्ती कॅफे अन्ड आयईस्क्रीम पार्लर, बियाणी कॉम्प्लेक्स आनंदनगर येथे तपासणी केली तेंव्हा त्यात चरण राजू गवाले (20) रा.हनुमानगढ, गंगाधर रामजी आरसुळे(19), शुभम श्रीहरी दासरवाड(21) आणि माधव अंकुश सांगळे (21) तिघे रा.श्रीनगर नांदेड हे युवक सापडले. कॅफे मालक शुभम निरंज भुसे (21) रा.कैलासनगर यांना ताब्यात घेवून पोलीसांनी त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 नुसार कायदेशीर कार्यवाही केली आहे. पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे आणि त्यांच्या पथकाने कॉफी शॉपवर ही कार्यवाही केली.
शहरातील आनंदनगर मधील कॉफी शॉपवर छापा टाकून कार्यवाही