जिल्ह्यात 13 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 7 पोलीस उपनिरिक्षकांचे खांदे पालट

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील 13 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 7 पोलीस उपनिरिक्षक अशा दोन पदांच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी खांदा पालट करून नवीन नियुक्ती दिली आहे. त्यात कांही नव्यानेच सहाय्यक पोलीस निरिक्षक झालेले अधिकारी आहेत.
आज दि.21 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिलेल्या आदेशात 13 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना नवीन ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात नियंत्रण कक्षात 6 सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे.
नवीन नियुक्ती मिळालेले सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण कंसात लिहिलेले आहे. कमलाकर नरसींह गडीमे-मुक्रामाबाद पोलीस ठाणे(देगलूर), संग्राम उध्दव जाधव-कंधार(मुक्रमाबाद), विजय दौलतराव जाधव-विमानतळ (रामतिर्थ), महादेव शिवाजी पुरी-नियंत्रण कक्ष(कुंटूर), करीम खान सालार खान पठाण-कुंटूर(कुंडलवाडी), नामदेव शिवाजी मद्दे-माहूर(मरखेल), आदित्य निवृत्तीराव लोणीकर-मरखेल(कंधार), नरसीह राम आनलदास-विमानतळ(नायगाव), संकेत वसंतराव दिघे-नियंत्रण कक्ष (नांदेड ग्रामीण), बाळू रघुनाथ गिते-नियंत्रण कक्ष (विमानतळ), विशाल पांडूरंग वाठोरे-नियंत्रण कक्ष(किनवट), शिवराज गंगाराम जमदाडे-नियंत्रण कक्ष(वजिराबाद), मुंजाजी नामदेव दळवे-नियंत्रण कक्ष (अर्धापूर)
सात पोलीस उपनिरिक्षकांना नवीन ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.त्यांचे नवीन नियुक्तीचे ठिकाण कंसात लिहिले आहे. शेख असद शेख चॉंद पाशा-नांदेड ग्रामीण(इतवारा), महेशकुमार कल्याणसिंह ठाकूर-विमानतळ(क्युआरटी), गजानन हरिहरराव कागणे-विमानतळ सुरक्षा पथक(मुक्रामाबाद), गोविंद विजय खैरे-नांदेड ग्रामीण(हदगाव), अनिसा फातीमा खदीर अली सय्यद-नियंत्रण कक्ष (धर्माबाद), विजय लिंगुराम पंतोजी-जिल्हा विशेष शाखा(धर्माबाद), आरती शिरिष पोवार-मुदखेड (शिवाजीनगर) असे आहेत.

वृत्तलिहिपर्यंत पोलीस निरिक्षक पदातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले नव्हते. कुंटूरचे करीम खान पठाण यांना अत्यंत तातडीने तोंडी आदेशावर नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले होते. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी त्यांच्या पदाला न्याय देत त्यांना कुंडलवाडी पोलीस ठाण्यात नवीन पदस्थापना दिली आहे. नव्यानेच नांदेड जिल्ह्यात आलेले संकेत दिघे ज्यांनी विक्की ठाकूर खून प्रकरणातील 8 आरोपी पकडण्याच्या पथकात काम केले होते. त्यांना नांदेड ग्रामीण सारख्या पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *