नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी प्रणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमदार राजेश पवार यांच्या गाडीवर दि.22 ऑगस्ट रोजी अज्ञात हल्लेखोरांनी दडफेक करून गाडीचे नुकसान केले आहे.
सुनिल दिगंबरराव पवार रा.फुलेनगर नांदेड यांनी पोलीस ठाणे नायगाव आणि पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे दिलेल्या अर्जानुसार ज्या अर्जावर पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेडच्या आवक विभागाने 23 ऑगस्टची स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार 22 ऑगस्ट रोजी सुनिल पवारचे मावस बंधू आ.राजेश पवार यांची चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.क्यु.8766 मध्ये बसून राजेश पवार यांच्या मातोश्री मौजे रातोळी येथे गेल्या होत्या. रातोळी येथे नरसी मुखेड रस्त्यावर आ.राम पाटील रातोळीकर यांच्या घरासमोर ही गाडी उभी असतांना कोणी तरी अज्ञात हल्लेखोरांनी आ.राजेश पवारं यांच्या गाडीवर दगडफेक करून नुकसान केले आहे. आ.राजेश पवार यांच्या कुटूंबातील कोणरी ही व्यक्ती या गाडीमध्ये हल्ला झाला तेंव्हा नव्हता. लोकप्रतिनिधीच्या गाडीवर झालेला हल्ला हा अतिशय गंभीर प्रकार आहे. घडलेल्या घटनेची योग्यती चौकशी करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात लिहिली आहे.