नांदेड,(प्रतिनिधी)- डॉ. आंबेडकर नगर नांदेड येथील जेष्ठ उपासीका प्रयागबाई पिराजी गच्चे वय वर्ष 80 यांचे आज सकाळी 9:30 वाजता ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे, तरी त्याच्या पार्थिव देहावर आज दि 29 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 8 वाजता गोवर्धन घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात 2 मुले 1 मुलगी सूना नातवंडे असा परिवार आहे. भीमशक्ती संघटनेचे जिल्हामहासचिव मधुकर गच्चे पाटील ,अशोक गच्चे यांच्या मातोश्री होत. यवतमाळचे सध्याचे परिवहन विभागातील मोटार वाहन
निरिक्षक किरणकुमार लोणे यांच्या त्या आजी होत.