नांदेड(प्रतिनिधी)- नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी महिला पोलीस अंमलदारांना 8 तासच कर्तव्यकाळ राहिल असे आदेश केल्यानंतर ते आदेश आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोस्ट करून इतर घटकप्रमुखांनी या चांगल्या आदेशावर विचार करावा असे लिहिले आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी 28 ऑगस्ट रोजी महिला पोलीस अंमलदारांना कर्तव्यासोबत आपली पारिवारीक जबाबदारी पार पाडावी लागते. ड्युटी आणि परिवार अशा दोन जबाबदाऱ्यांचा ताळमेळ महिला पोलीसांना घालावा लागतो. यावरून नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सर्व महिला पोलीस अंमलदारांना आपली शासकीय ड्युटी करतांना गृहणी म्हणून आपले कर्तव्य लक्षपुर्वक करता यावे म्हणून महिला पोलीस अंमलदारांचा कर्तव्यकाळ फक्त 8 तासच राहिल असे आदेश दिले.
म्हणून नागपूर पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांना महिला पोलीस अंमलदारांना फक्त 8 तासच कर्तव्य देण्यात यावेत असे आदेश आहेत. रात्र पाळीचे कर्तव्य पुर्वी प्रमाणेच राहिल. कायदा व सुव्यवस्था असा प्रसंग असला तर, बंदोबस्त, सण, उत्सव असे समारोह असतील तर प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या पोलीस उपआयुक्तांची परवागनी घेवून महिला पोलीस अंमलदारांच्या कामकाजाची वेळ वाढवून घ्यावी. हा आदेश प्रायोगीक तत्वावर निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशाची योग्य अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी पोलीस उपआयुक्तांवर देण्यात आली आहे.
हा आदेश झाल्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर या आदेशाची प्रत पोस्ट केली आहे. सोबतच राज्यातील इतर पोलीस घटकप्रमुखांनी या चांगल्या आदेशाचा विचार करावा असेही लिहिले आहे. पोलीस महासंचालकांच्या या शब्दानुसार राज्यभरात सुध्दा महिला पोलीस अंमलदारांना 8 तासच कर्तव्यकाळ देण्यात यावा असे त्यांना अपेक्षीत आहे.पोलीस महासंचालक संजय पांडे हे पोलीस अंमलदारांच्या कल्याणाचा भरपूर विचार करतात म्हणूनच त्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांचा आदेश राज्यभरातील पोलीस घटकप्रमुखांनी विचारात घ्यावा असे लिहिले आहे.
महिला पोलीसांना 8 तास कर्तव्यकाळ द्या अशी पोलीस महासंचालकांची अपेक्षा