नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेची 95 हजारांचा ऐवज असलेली बॅग दोन दरोडेखोरांनी पळविल्याचा प्रकार दुपारी 4 वाजेच्यासुमारास मोरचौक नांदेड येथे घडला आहे.
सुनिता बालाजी गरुडकर रा.यशवंतनगर या महिला 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता आपल्या पतीसोबत स्कुटीवर बसून जात असतांना त्यांनी आपली पर्स आपल्या मांडीवर ठेवलेली होती. त्या पर्समध्ये सोन्याचे गंठण, मोबाईल, हात रुमाल, पेन, गॉगल आणि रोख रक्कम, 3 हजार रुपये असा 95 हजारांचा ऐवज होता. दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात दरोडेखोरांनी ती बॅग बळजबरीने हिसकावून नेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भोसले करीत आहेत.