नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कहाळा येथे उतरून घरी गेलेल्या महिलेने आपली बॅग तपासली तेंव्हा त्यातून 2 लाख 7 हजार 240 रुपयांचे सोन्याचे दागिणे चोरीला गेल्याचे दिसले. भाग्यनगर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काळेश्र्वर मंदिरात एक मोबाईल चोरीला गेला आहे आणि एक दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.
भाग्यशिला नामदेव उलगुलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 ऑगस्ट रोजी त्या एस.टी.बस क्रमांक एम.एच.20 बी.एन.3559 मध्ये प्रवास करून आपल्या लेकरांसह कहाळा खुर्द ता.नायगाव येथे उतरल्या. त्यांनी घरी जाऊन आपली बॅग तपासली तेंव्हा त्यातील 2 लाख 7 हजार 240 रुपये एवढ्या किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरीला गेले होते. कंटूर पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक येवले अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेश्र्वर मंदिर येथे दि.30 ऑगस्ट रोजी दुपारी ममता अशोक सावंत आणि इतर लोक श्रावणी सोमवार निमित्त भगवंताचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बॅगमधील 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल त्यांच्या पाठीमागे उभे राहुन चोरट्यांनी काढून घेतला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार माधव गवळी अधिक तपास करीत आहेत.
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान माधव विश्र्वंभर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एल.5704 ही 16 हजार रुपये किंमतीची गाडी 26 ऑगस्टच्या रात्री 11 ते 27 ऑगस्टच्या पहाटे 7 वाजेदरम्यान शिवसाईनगर तरोडा येथील त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून कागणे अधिक तपास करीत आहेत.
बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचे 6 तोळे सोने चोरले