भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यात ५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपये साखर विक्री घोटाळा 

माहिती गुप्त ठेवण्यात एक आठवडा यश आले;आज दोन जण पोलीस कोठडीत 
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यात ५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपयांचा अपहार असा मोठा घोळ झाला असून घोळ करणाऱ्या दोघांना मुदखेडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  एस.बी.भांबरे यांनी चार दिवस,अर्थात २ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दिलेल्या तक्रारीनुसार बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 86/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420, 467 आणि 34 नुसार दाखल झाला. या प्रकरणात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची  ५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६  रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. साखर विक्री संदर्भाने हा प्रकार घडला आहे.साखर सरकारला विक्री करण्यात आली होती.ती सरकार कोणती या बाबत माहिती प्राप्त झाली नाही. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अत्यंत गोपनिय पध्दतीने याचा तपास सुरू होता. पोलीस ठाणे बारड हे कर्तव्यदक्ष अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या अखत्यारीतील पोलीस ठाणे आहे.ज्यांनी कबाडे यांना पसंती देऊन भोकरला  आणले आहे. त्यांनी इतरांच्या प्रकरणात काय घडले त्याबाबत विचार केला नाही तरी ठीक पण आता आपल्याच घरात झालेल्या घोटाळ्यानंतर तरी गंभीर विचार करण्याची गरज आहे. या दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 86 चा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार तामिळनाडु येथील चेन्नईमध्ये राहणारा प्रदीपराज चंद्राबाबू (43), रुही ता.अहमदनगर येथील अभिजित वसंतराव देशमुख या दोघांना नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. अभिजित देशमुखची पोलीस कोठडी आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संपली आहे.  अभिजित देशमुख मागील सात दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे.बारड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ८६/२०२१ सर्वच अभिलेखातून बाहेर ठेवण्यात आला आहे.आर्थिक गुन्हे शाखेने आज अभिजित देशमुखसह प्रदीपराज चंद्राबाबू आणि इंडिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता रा.गंगानगर आनंदपूर आंध्रप्रदेश अश्या तिघांना  मुदखेड न्यायालयात हजर करून देशमुखची पोलीस कोठडी वाढवून देण्याची आणि प्रदीपराज आणि डिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता यांना  पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ऍड.जे.एन.वडेर यांच्यावतीने केली. न्या.भामरे यांनी अभिजित देशमुख यांना न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून न देता न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्यांच्यावतीने ऍड, नवनाथ पंडित यांनी जामीन मिळावा असा अर्ज केला आहे.त्यावर सरकारी वकील ऍड.जे. एन.वडेर यांनी वेळ मागितला आहे.त्या अर्जावर सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे. अर्थात देशमुख आता तुरुंगात जातील,  उर्वरित पकडलेले आरोपी प्रदीपराज चंद्राबाबू आणि डिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता  या दोन जणांना न्या,एस.बी.भांबरे यांनी ४ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
                     या गुन्ह्याची माहिती गुप्त का ठेवण्यात आली याचा काही शोध लागला नाही. पारदर्शक राजकारण, पारदर्शक कामकाज हेच जीवनाचे खरे गणित असतांना आपल्या कारखान्यात झालेल्या या आर्थिक घोटाळ्याचा प्रकार लपविला का ? हा प्रश्न समोर येत आहे. पोलीस विभागाने सुध्दा त्या गुन्ह्याची माहिती रोजच्या प्रेसनोटमध्ये दिली नाही. कोणात्याही पोलीसाला याबद्दल विचारले तर तो कानावर हात ठेवतो आहे. असा एक नवीन प्रकार या गुन्ह्याच्या संदर्भाने समोर आला आहे.सूर्याजी पिसाळने एक पत्र पोलीस अधीक्षकांना लिहून पत्रकारांची तपासणी करण्याची सूचना केली असल्याचे वृत्त आपणच प्रसिद्धीसाठी देऊन एका पत्रकाराला गोचित आणले होते. एखाद्या गरीबाचा घोटाळा झाला तर त्याची प्रेसनोट काढली जाते.पण भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यात  जवळपास ६ कोटी रुपयांचा अपहार झाला आणि तो पडद्यामागे राहील यासाठी घेण्यात आलेली दक्षता प्रशंसा करण्यासारखी आहे.
                या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचा एफआरपी दिलेला नाही.आता जवळपास ६ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.यात नक्कीच कोठेतरी कारखान्याची नियोजन चुकलेली आहे.गुन्हा दाखल झाला.आरोपीना अटक झाली.तरीही कारखान्याचे ६ कोटी रुपये परत येणार काय? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही.यावरून आज पुन्हा एकदा ‘पोलीस खाते करील तेच होईल’ हा वाकप्रचार खरा ठरला. आणि पत्रकारांनी जे सत्ता धाऱ्यांना छापू वाटत नाही ते छापून सत्य जनतेसमोर आणले आहे.नाहीतर बाकी नाते जपण्याचा प्रकार आहे असे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *