नांदेड (प्रतिनिधी)- आज दि. 1 सप्टेंबर रोजी एका महिलेने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावरील सुरक्षा रक्षकाच्या कक्षास असलेल्या काचा फोडल्या. या महिलेल्या दुपारपर्यंत पोलिसांनी पकडले आहे.
सकाळी 10 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील अशोक चव्हाण यांच्या घरासमोरून एका तीनचाकी गाडीवर आलेल्या महिलेने दगडफेक केली. तेथील सुरक्षा रक्षक त्या महिलेला रोखत होता, पण तिने काही ऐकले नाही आणि सुरक्षा रक्षकाच्या समोर असलेल्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह अनेक अधिकारी, पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. अशोक चव्हाण कालच, 31 ऑगस्ट रोजी मुंबईला सहकुटूंब गेले आहेत, अशी माहिती सांगण्यात आली. अशोक चव्हाण यांच्या घरात आणि इतर ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलीस दगडफेक करणाऱ्या महिलेचा शोध घेत होते.
स्थानिक गुन्हा शाखेने दुपारपर्यंत या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ती महिला काही बोलत नाही. याबाबत अशोक चव्हाण यांच्या घरी सुरक्षा रक्षक असलेला पोलीस अंमलदार अशोक मुपडे यांच्या तक्रारीवरून महिलेविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 336, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक चव्हाण यांच्या घरासमोर सुरक्षा रक्षक कक्षावर दगडफेक करणारी महिला पकडली