नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी पोलीसांनी एका 19 वर्षीय युवकाच्या ताब्यातून चोरीच्या 7 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
माळाकोळी येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक गित्ते, पोलीस अंमलदार किरपणे, पल्लेवाड, मडके आणि भुरे यांनी गोपनिय माहितीच्या आधारे एकुरगा खुर्द ता.जळकोट जि.लातूर येथील हरिओम बापूराव मुुंडे या युवकास ताब्यात घेतले. त्याने 7 दुचाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलीसांनी या सात दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरिक्षक माणिक डोके यांनी जनतेला आवाहन केले आहे की, चोरीच्या दुचाकी गाड्यांची ओळख पटवून घ्यावी. आपली गाडी या सात दुचाकींमध्ये असेल तर कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून आपल्या गाड्या घेवून जाव्यात. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, कंधारचे पोलीस उपअधिक्षक किशोर कांबळे यांनी माळाकोळी पोलीसांचे कौतुक केले आहे.
माळाकोळी पोलीसांनी चोरीच्या सात दुचाकी गाड्या पकडल्या