नांदेड(प्रतिनिधी)-एका 11 वर्षीय बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्या 21 वर्षीय युवकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश, विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी 3 वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेच्या नातलगाने दिलेल्या तक्रारीनुसार 16 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास शेतामध्ये ती आणि त्यांची अल्पवयीन बालिका नातलग एकटे असतांना तक्रारदार महिला नैसर्गिक विधीसाठी दुसऱ्या शेतात गेली. त्यावेळी त्या शेताच्या शेजारीच शेत असलेला राजू गंगाधर नांद्रे (21) हा तेथे आला आणि त्याने बालिकेसोबत लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 51/2017 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.के.डमाळे यांनी करून राजू गंगाधर नांद्रे विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात या प्रकरणी 7 साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी राजू गंगाधर नांद्रे यास भारतीय दंडसंहितेच्या कलम 354(1)(आय) नुसार तीन वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपय रोख दंड ठोठावला. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सौ.एन.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून बारड येथील पोलीस अंमलदार एस.टी. आठवले यांनी काम केले.