नांदेड (प्रतिनिधी)- पैनगंगा प्रकल्प आणि पूर्णा प्रोजेक्टच्या माध्यमातून जलक्षेत्रात प्रल्हाद भालेराव यांचे कार्य उल्लेखनीय असेच राहिले असल्याचे प्रतिपादन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केले.
○जलसिंचन विभागात कनिष्ठ अभियंता ते प्रभारी कार्यकारी अभियंता पदापर्यंत दल मजल करत 39 वर्षाची सेवा पूर्ण करून प्रल्हादराव भालेराव नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नानक साई फाऊंडेशन च्या वतीने त्यांचा जीवन गौरव सोहळा नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता. नानक साई चे संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शानदार सोहळ्यास हदगाव चे काँग्रेसचे आमदार श्री माधवराव पाटील जवळगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर,माजी उपमहापौर सतिशराव देशमुख, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष मोहम्मद खान पठाण, एन आय सी चे अधीक्षक अभियंता समाधान सबीनवर, दातात्र्यय सावंत,कार्यकारी अभियंता अभय जगताप,विजय कुरुंदकर, उपअभियंता सुदेश देशमुख, निवृत्त उप अभियंता महाजन उप्पलवार,जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव देशमुख,पाशा पटेल यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
○आ.जवळगावकर यांच्या हस्ते यावेळी भालेराव यांचा जीवन गौरव विशेष सन्मान देऊन गौरव करण्यात आला. 39 वर्षे पाटबंधारे विभागात यशस्वी कारकीर्द पूर्ण करून ते 31 आगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. जल व्यवस्थापण क्षेत्रात प्रल्हाद भालेराव यांची कारकीर्द उल्लेखनीय अशीच राहीली आहे,नानक साई परिवाराने त्यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांचा जीवन गौरव सोहळा घडवून आणला याबद्दल आ. जवळगावकर यांनी धन्यवाद व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवानराव आलेगावकर यांनी पाटबंधारे विभागाचे काम सर्वांसाठी महत्त्वाचे असून भालेराव यांनी जल सेवा मोठया निष्ठतेने करून सर्वसामान्य शेतकरी आणि लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी काम केले असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांनी केले, सौ.संगीता ताई भालेराव, प्रतीक भालेराव, कु स्नेहल भालेराव, उत्तमराव शिंदे बाचे गावकर यांची मनोगत झाले. नानक साई परिवार च्या सेक्रेटरी सौ.प्रफुल्ला बोकारे पाटील, प्रोजेक्ट चेअरमन धनंजय उमरीकर, प्रा.गजानन देवकर, श्रेयस कुमार बोकारे, पुंडलिक बेलकर, अशोक जाधव, मारोती शिंदे, संजय जाधव, व्यंकटेश भालेराव,गोविंद राऊत, सय्यद अजहर, सौ. विजया जाधव सुगावकर,प्रकाश अजमेरा, शाहू कुलथे, प्रणव भालेराव,सुभाष भालेराव,ज्योती भालेराव,व्यंकटेश शिंदे,सुनील देशमूख,अनिल मयेड,क्षीरसागर,,सतीश देखमुख,
दीपाली भालेराव,प्रवीण भालेराव,प्रांजल भालेराव,प्रणय भालेराव, पल्लवी भालेराव,विठ्ठल तामस्कर,विशाखा तामस्कर, वैशाली बोधनकर,बळवंत बोधनकर,देवराव चोरमले, विद्या चोरमले,दशरथ पोळ,शीला पौळ, अशोक दांडगे,
सुखलाल दांडगे,नारायण चौधरी,मीना चौधरी, सुनिता सूर्यवंशी,प्रवीण सूर्यवंशी,गोपीनाथ वारांगेकर,बळीराम भालेराव,उषा भालेराव यांची उपस्थिती होती.