नांदेड(प्रतिनिधी)-शहर पोलीस उपविभाग कार्यालयाने दि.23 ऑगस्ट रोजीची तारीख लिहिलेले एक माहिती अधिकाराच्या अर्जातील उत्तर पाठविले आहे. या अर्जावर 23 ऑगस्टला बदलीवर सोडलेल्या माहिती अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे. माहिती अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यात बदलून गेला आहे आणि माहितीच्या उत्तरात गुन्ह्याचा तपास सुरू आहे असे लिहिले आहे. मग गुन्ह्याचा तपास सुरू असतांना पोलीस उपअधिक्षकांना याची चौकशी कशी करता येते हा एक कायदेशीर प्रश्न या उत्तराने समोर आला आहे.
नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 216/2021 दाखल झाला.या बाबत एक राजाहरिशचंद्र असलेल्या व्यक्तीने पुन्हा अर्ज केला आणि त्या प्रकरणात आरोपी वाढविण्याची मागणी केली.वास्तविक या गुन्ह्याचा तक्रारदार शासकीय वर्ग-1 चा अधिकारी आहे. हरिशचंद्राच्या अर्जाची चौकशी शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक यांच्याकडे होती. त्यानंतर जवळपास 1 महिन्याने दि.6 ऑगस्ट रोजी माहितीच्या अधिकारात पोलीस उपअधिक्षक कार्यालयाने केलेली गुन्हा क्रमांक 216 ची चौकशी आणि त्यांची संपूर्ण संचिका सत्यप्रत करून देण्यासाठी अर्ज आला. 6 ऑगस्टच्या या अर्जाचे उत्तर अर्ज देणाऱ्याला 1 सप्टेंबर 2021 रोजी प्राप्त झाले. या अर्जावर माहिती अधिकारी म्हणून पोलीस उपअधिक्षकांचे वाचक सहाय्यक पोलीस निरिक्षक शरद मरे यांची स्वाक्षरी आहे. या अर्जावर तारीख 23 ऑगस्ट 2021 लिहिलेली आहे. शरद मरे यांची बदली परभणी जिल्ह्यात झाली आहे आणि त्यांना नांदेड जिल्ह्यातून 23 ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करण्यात आल्याचा अभिलेख आहे.
मागीतलेल्या माहितीचे उत्तर देतांना माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 8(1)(ज) प्रमाणे मागितलेली माहिती नाकारतांना हा गुन्हा तपासावर असल्याचे शब्द नमुद आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालय सुध्दा गुन्ह्याच्या तपासात हस्तक्षेप करत नाही. ही बाब जवळपास सर्वांनाच माहित आहे. ऑगस्ट महिन्यात तर सर्वोच्च न्यायालयाने केस डायरी सुध्दा सार्वजनिक अभिलेख आहे असा एक निकाल दिला आहे. त्यामुळे पोलीस उपअधिक्षक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गुन्हा तपासीक अंमलदाराकडे प्रलंबित असतांना स्वत: गुन्ह्याची चौकशी कशी करू शकतात. हा एक प्रश्न असा तयार झाला आहे की त्याचे उत्तर शोधण्यासाठी एखाद्या विद्यावास्पती पदवी प्राप्त असलेल्या व्यक्तीची नियुक्ती उच्चस्तरावरून करावी लागेल.
गुन्हा तपासावर असेल तर माहिती देता येत नाही; पण गुन्ह्याची चौकशी सुरू राहते ; पोलीस उपअधिक्षक कार्यालय नांदेड शहरचा प्रकार