नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीच्या खिशातून 18 हजार 300 रूपये काढून घेतल्याचा प्रकार नांदेड शहरातील डॉक्टर्स लेन परिसरात घडला आहे.
दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास संभाजी मुंजाजी बोडके हे जात असताना डॉक्टर्स लेन परिसरातील एचडीएफीसी बॅंकेखाली असलेल्या चष्माच्या दुकानाजवळ एका माणसाने त्यांना गाठले आणि मी पोलीस अधिकारी आहे, तुमच्याजवळ दारू आहे असे सांगत त्यांच्या खिशातील डायरी, कागदपत्रे आणि पैसे काढण्यास सांगितले. संभाजी बोडके यांनी तोतया पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून सर्व साहित्य काढून दिले, त्यातील 18 हजार 300 रूपये घेऊन हा तोतया पोलीस पसार झाला. बाकीचे साहित्य संभाजी बोडके यांना परत केले. वजिराबाद पोलिसांनी तोतया पोलिसाविरूद्ध 315/2021 दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रविण आगलावे अधिक तपास करीत आहेत.
तोतया पोलीस अधिकाऱ्याने 18 हजार 300 रूपये काढून घेतले