नांदेड(प्रतिनिधी)-अतिवृष्टीमु
नांदेड जिल्ह्यात पर्जन्यवृष्टीने जोरदार प्रहार केल्यामुळे शेतकरी व शेतमजुर परिवार त्रासात आले. या पार्श्र्वभूमीवर तयार झालेल्या ओला दुष्काळ या परिस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयातील शेतकरी व शेतमजुर परिवाराच्या सर्व विद्यार्थ्यांना फि माफ करावी असे निवेदन युवा सेनेने कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांना दिले आहे. या निवेदनावर शहर अधिकारी रोहित उर्फ साई विभुते, उपशहर अधिकारी सौरभ शेळके, उप तालुका अधिकारी अशोक पावडे, तालुका समन्वयक पुरभाजी जाधव, गजानन मोरे, अजय सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आली आहे.
ओला दुष्काळ परिस्थितीत फी माफ करा युवा सेनेचे निवेदन