भाग्यनगरचा राजा श्री गणेश मंडळाच्यावतीने 17 सप्टेंबर रोजी महारक्तदान शिबिर

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगरचा राजा श्री गणेश मंडळाच्यावतीने दि.17 सप्टेंबर रोजी भाग्यनगर येथील कदम हॉस्पीटलच्या शेजारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संयोजक विशाल संपतवार यांनी आवाहन केले आहे की, जास्तीत जास्त संख्येत लोकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होवून रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान याचा संदेश प्रसारीत होईल यासाठी प्रयत्न करावेत.
सध्या कोरोना महामारीची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या गणेश उत्सवात लोकांनी जास्तीत जास्त आरोग्य विषयक देखावे, आरोग्य विषयक कामकाज करावे असे आवाहन महाराष्ट्र सरकारने पण केलेले आहे. नांदेड शहरातील भाग्यनगरचा राजा श्री गणेश मंडळ या मंडळाच्यावतीने दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेदरम्यान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. मित्र परिवाराने या रक्तदान शिबिरात सहभागी होवून रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान आहे हा संदेश पसरविण्यासाठी सहकार्य करावे असे अवाहन विशाल संपतवार, युवा प्रहार मित्र मंडळ, शिवशंभु प्रतिष्ठाण, शिवरौद्र शंभो मित्र मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *