वजिराबाद पोलीसांचे पथसंचलन 

नांदेड(प्रतिनिधी)-गणेशोत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस ठाणे वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वात आज पथसंचलन करण्यात आले.
पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम, पोलीस निरिक्षक पगारे, पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव, उत्तम वरपडे पाटील, पोलीस ठाणे वजिराबादचे अनेक पोलीस अंमलदार, महामार्ग पोलीस अंमलदार, लातूर प्रशिक्षण महाविद्यालयातील अनेक पोलीस अंमलदार आणि गृहरक्षक दलाचे जवान, महिला पोलीस अंमलदार, गृह रक्षक दलाच्या महिला जवान या पथसंचलनात सहभागी झाल्या होत्या.


पोलीस ठाणे वजिराबाद येथून निघालेले हे पथसंचलन गुरूद्वारा, टावर, मुख्य रस्त्याने वजिराबाद, देगावचाळ, बसस्थानक, परत वजिराबाद चौक, शासकीय रुग्णालय यांच्यासमोरून चालत पुन्हा वजिराबाद पोलीस ठाण्यात आले.
या पथसंचलनाच्या संदर्भाने बोलतांना पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार म्हणले, कोविड परिस्थितीमध्ये दिलेल्या सुचना आणि आपला महोत्सव साजरा करतांना प्रत्येकाने कायद्याचे रक्षण होईल असे वागण्याची गरज आहे. कायद्याच्याविरुध्द वागेल त्याबाबत त्वरीत प्रभावाने कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *