नांदेड, (प्रतिनिधी)- आज १७ सप्टेंबर २०२१ मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ७३ वर्धापन दिन. सर्व जनतेला मुक्ती संग्रामच्या इतिहास माहित होणे आवश्यक आहे असे सांगत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जनतेला शुभकामना दिल्या.
आज मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या ७३ व्य वर्धापन दिनी सकाळी ८.३० वाजेपासूनच विसावा उद्यानात कार्यक्रमाची सुरुवात झाली.पालकमंत्री अशोक चव्हाण,जीप अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर,महापौर मोहिनी येवनकर,जिल्हाधिकारी डॉ विपीन,जीपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने,पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे.आ.मोहन हंबर्डे,आ.बालाजी कल्याणकर, आ.अमरनाथ राजूरकर,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. राखीव पोलीस निरीक्षक व्ही,के.धोंडगे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी सलामी दिली.बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. सकाळी ९ वाजता पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.राष्ट्रगीत धून वाजवून पोलीस पथकाने मानवंदना दिली.

त्यानंतर बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनाच्या शुभकामना दिल्या.तसेच स्वातंत्र्य संग्रामात होतात्म्य पत्कराणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले.निझामाच्या जुलमी तावडीतून मराठवाड्याला बाहेर पडता यावे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात फार मोठा लढा दिला गेला. त्या लढ्यात लोकशाही साठी असलेले मूल्य सर्वानी लक्षात घेतले पाहिजे. ज्या लोकशाही मूल्यांसाठी महात्मा गांधी आग्रही होते.त्याच लोकशाही मूल्यांपासून प्रेरणा घेऊन स्वामीजीं घडले आणि हा मराठवाडा मुक्ती संग्राम लढा उभारला होता. त्यांनी या मूल्यांसाठी लढा दिला.
आज आम्ही अद्याप कोरोना महामारीतून बाहेर पडलेलो नाहीत.त्यानंतर पर्यावरण असमतोलामुळे अतिवृष्टीची आपत्ती आली.त्यात आम्ही आपले २६ बंधू – भगिनी गमावले आहेत.त्यासाठी सरकार आपले कार्य करीत आहे.पण सर्वांची एकजूट महत्वपूर्ण आहे. शेतकरी पुन्हा उभे राहण्यासाठी झट आहेत.यंदा त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि नैसर्गिक आव्हानातून बाहेर पाडण्यासाठी आता एकजूट हवी.नवीन पिढीला मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती व्हावी म्हणून एक प्रदर्शन आयोजित केले आहे.त्यातून नवीन पिढीला हा संग्राम जाणून घेता येणार आहे.असे सांगत ७३ व्या मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभकामना दिल्या.