कृषी कन्येने केले वृक्षारोपण

नांदेड(प्रतिनिधी)-आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी एका कन्येने आपल्या शिक्षणातील कार्यानुभवाच्या निमित्ताने गोळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वृक्षारोपण केले.
वसंतराव नाईक ग्रामीण महाविद्यालय नेहरुनगर नागलगाव ता.कंधार येथे  निवृत्ती राम रामनबैनवाड ही  मुलगी कोमल  कृषी शिक्षण घेत आहे. सन 2021-22 च्या शैक्षणिक वर्षात ग्रामीण जागरुकता कार्यानुभव या दरम्यान त्यांनी आज 17 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोलेगाव (प.क.) येथे भेट देवून वृक्षारोपण केले.
कृषी कन्या कोमल निवृत्ती रामनबैनवाड यांनी आपल्या शिक्षणासह ग्रामीण भागात वृक्षारोपणाचे काय महत्व आहे हे सांगितले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पोले, इतर शिक्षक, गव्हाणे, बोधनकर, माने, लोंडे, सौ.लुंगारे आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरुनगरचे प्राचार्य डी.जी.मोरे, डॉ.ए.एच.नण्हेर, डॉ.के.बी.पलेपाड, डॉ.व्ही.एस.पवार, प्रा.पी.एस.काळे, प्रा.जी.एस.वाळकुंडे, प्रा.बी.एम.गोणशेटवार यांच्या मार्गदर्शनात कोमल रामनबैनवाड यांनी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव पुर्ण करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *