नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगातील थकबाकीचा दुसरा हप्ता जुलै महिन्यातील वेतनासोबत अदा करण्याचा शासन निर्णय दिला होता. तरीपण आता सप्टेंबर महिन्याचे वेतन देण्यात आल्यानंतर सुध्दा थकबाकीची रक्कम मात्र अद्याप देण्यात आलेली नाही. यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आपली व्यथा व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्रमांक वेपुर-2019/प्र.क्र.8/सेवा-9 दि.30 जून 2021 नुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि.1 जुलै 2021 रोजी सातव्या वेतन आयोगातील थकबाकीतील तिसरा हप्ता देये आहे असा निर्णय घेतला होता. त्यानुसार निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची थकबाकी रक्कम जुलै 2021 च्या निवृत्ती वेतनासोबत अदा करण्यात यावी असे आदेश दिले होते. इतर कर्मचाऱ्यांना हा हप्ता सप्टेंबर 2021 मध्ये अदा करण्यात यावा असे लिहिले होते. जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेली आहेत. त्यांना मृत्यूनंतरच्या वेतनाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता रोखीने अदा करण्यात यावा असे लिहिले आहे. या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याच्या रक्कमेवर 1 जुलै 2020 पासून व्याज अनुज्ञय राहिल असे लिहिले आहे.
सध्या सप्टेंबर महिना सुरू असून अद्याप हा सेवानिवृत्ती वेतनातील थकबाकीचा हप्ता नांदेड पोलीस परिक्षेत्रातील लातूर आणि हिंगोली या जिल्ह्याला मिळाला आहे. मात्र नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यात हा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा हप्ता अद्याप देण्यात आलेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घ्यावी अशी अपेक्षा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून हो त आहे.
नांदेड आणि परभणी जिल्ह्यात पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता अद्याप प्राप्त नाही