रंगीत पाण्याच्या प्रवाहात लिहिलेल्या बातमीची सत्यता उघड

अपर पोलीस अधिक्षक भोकर यांच्यासाठीचे नांदेड येथील कक्ष अभिलेखावरच नाही
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील पोलीस अभिलेखामध्ये कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने 23 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात येणाऱ्या लोकांच्या तपासणी संदर्भाने कोणतेही पत्र दिले नाही. असे उत्तर माहिती अधिकारात पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रथम अपीलीय अधिकारी, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय विकास तोटावार यांनी दिले आहे. यावरून 26 ऑगस्ट रोजी वर्तमान पत्रातून कोणत्या सुर्याजी पिसाळामुळे बातमी प्रसिध्द करण्यात आली हे शोधण्यासाठी आता नवीन तंत्र अवगत करावे लागेल.
दि.25 ऑगस्ट रोजी एका मोठ्या वर्तमान पत्रात पोलीस अधिक्षक कार्यालयात येणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांची आता कसून चौकशी होणार अशा आशयाची बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी याच बातमीला नवीन मुलामा देवून त्या बातमीमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने 23 ऑगस्ट रोजी असे पत्र पोलीस अधिक्षक कार्यालयात दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
या संदर्भाने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता जन माहिती अधिकारी, पोलीस अधिक्षक कार्यालय यांनी दिलेल्या मोघम उत्तरांमुळे त्याचे अपील करण्यात आले होते. या अपीलामध्ये 23 ऑगस्टचे पत्र कोणी दिले ज्याच्या आधारावर बातम्या छापण्यात आल्या अशी विचारणा करण्यात आली होती. तसेच अपर पोलीस अधिक्षक भोकर यांना कोणाच्या आदेशाने पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वतंत्र वातानूकुलीत कक्ष उपलब्ध करून देण्यात आला याची विचारणा करण्यात आली होती. या तसेच या कक्षासाठी किती खर्च झाला याची विचारणा करण्यात आली होती. अपील प्रकरणात 23 ऑगस्ट 2021 चे मागितलेले पत्र अभिलेखावर नाही तसेच अपर पोलीस अधिक्षक भोकर यांच्या पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथील कक्षाची माहिती अभिलेखावर उपलब्ध नाही असे उत्तर अपीलीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.
पोलीस अधिक्षक कार्यालयातील कक्ष क्रमांक 32 वर पोलीस अधिक्षकांचे लघु लेखक असे लिहिलेली पाटी आहे. या कक्षात आत शिरताच दोन वेगवेगळे भाग आहेत. एका भागात नवीन कॅबीन तयार करण्यात आली. अगोदर या कॅबीनच्या काचा पारदर्शक होत्या आणि यातच अपर पोलीस अधिक्षक भोकर हे ठाण मांडून बसत होते. पण सध्या काचांवर फिलम लावण्यात आली आहे. त्यामुळे कांचाची पारदर्शकता समाप्त झाली आहे. पोलीस अधिक्षकांचे लघुलेखक या कॅबीनच्या डाव्या बाजूला बसतात. अशी या कक्षाची परिस्थिती आहे. पण अभिलेखावर कांही नाही. तसेच 23 ऑगस्ट रोजी कोणत्या सुर्याजी पिसाळाने दिलेल्या पत्राच्या आधारावर त्या भल्या मोठ्या वर्तमानपत्रात बातमी प्रसिध्द करण्यात आली ते पत्र सुध्दा पोलीस अभिलेखात नाही असे उत्तर देण्यात आले आहे. यावरून हा सर्व रंगीत पाण्याचाच प्रकार आहे हे सिध्द झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *