नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाच्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या बैठकीत अनुकंपा यादीवरील गरजवंतांना सेवेत घ्यावे आणि नोकरीवरून बडतर्फ आणि निलंबित केलेल्या लोकांना परत बहाल करावे अशा आशयाचे दोन निवेदन सरदार लखनसिंघ लांगरी यांनी गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स.भुपिंदरसिंघ मिन्हास आणि जिल्हाधिकारी नांदेड तसेच गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांना दिले आहेत.
सरदार लखनसिंघ लांगरी यांनी दिलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, गुरूद्वारा बोर्डात काम करणारे अनेक कर्मचारी सेवानिवृत्ती अगोदरच मरण पावले. अशा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबाला होणाऱ्या आर्थिक त्रासातून वाचविण्यासाठी सरकारने अनुकंपा नियमावली जारी केली आहे. गुरूद्वारा बोर्डात अनेक कर्मचारी अशा प्रकारे अवेळीच गेले आहेत. त्यांच्या वारसांना अनुकंपा लाभ देवून त्यांना नवीन नियुक्ती द्यावी.
दुसऱ्या मुद्यात गुरूद्वारा बोर्डातील अनेक कर्मचाऱ्यांना लहान-लहान चुकांसाठी नोकरीवरून बरखास्त करण्यात आले आहे. किंवा निलंबित करण्यात आले आहे. अशा कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अनेकांना आपली घरे नाहीत. आपल्या बालकांच्या शिक्षणाची सोय ते करू शकत नाहीत. कोरोना काळामुळे अशा कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. गुरूद्वारा बोर्डाच्या 30 ऑगस्टच्या बैठकीत अशा कर्मचाऱ्यांना कामावर घेवू असे आश्र्वासन देण्यात आले होते. पण अद्याप घेण्यात आले नाही तरी अशा सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे असे या निवेदनात लिहिलेले आहे.
गुरूद्वारा बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या अन्यायाला दुर करा-लखनसिंघ लांगरी