नांदेड(प्रतिनिधी)-पोळ्याच्या दिवशी बिलोली शहरात दोन गटात झालेल्या हाणामारी संदर्भाने बिलोलीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.आर.देशपांडे यांनी तीन वेगवेगळ्या प्रकरणातील 18 आरोपींना जामीन मंजुर केला आहे.
दि.6 सप्टेंबर रोजी पोळा सण होता या संदर्भाने वेगवेगळ्या कारणांमुळे बिलोली येथील कुरेशी गल्ली भांडण झाले आणि ते भांडण पोलीसांसमक्ष घडले. यात कांही जण जखमी झाले. जमावाला शांत करतांना पोलीसांनी भरपूर प्रयत्न केले. पण घडलेल्या प्रकारासंदर्भाने बिलोलीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा क्रमांक 165/2021 दाखल झाला. यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 353, 332, 324, 326, 160, 452, 109, 323, 504, 506 आणि 34 जोडण्यात आली होती. याप्रकरणात अनेक आरोपी होते. त्यातील मुकेश मोहनलाल जोशी, ज्ञानेश्र्वर नागोराव करडे, लिंगुराम रामेश्र्वरराव ठकरोड, सचिन उमेश गंडमोड, गणेश अशोक महेत्रे, गजानन दामोधर पांचाळ, श्रीकांत राम गाडगे, ऋषीकेश गंगाधर गंगरोड, साईनाथ मारोती शंकपाळे, अजरोद्दीन हबीबोद्दीन कुरेशी, अस्लम सत्तार कुरेशी, वाहेद कादीर कुरेशी, करीम अनवर कुरेशी, नासिर मौलाना कुरेशी, अलीम मोहियोद्दीन कुरेशी, हमीद अब्दुल हक कुरेशी, कलीम कासीम कुरेशी, आसीफ इमरान कुरेशी अशा 18 जणांनी जिल्हा न्यायालय बिलोली येथे अर्ज क्रमांक 150, 151, 153,154 दाखल करून जामीन मागितला होता. यातील अर्ज क्रमांक 154 मधील अर्जदाराने तो जामीन मागणीचा अर्ज परत घेतला.
उपलब्ध लेखी पुरावा आणि युक्तीवाद यावर आधार ठेवून न्यायाधीश डी.आर.देशपांडे यांनी अर्ज क्रमांक 150, 151 आणि 153 मधील 18 अर्जदारांना अर्थात गुन्हा क्रमांक 165 मधील आरोपींना जामीन मंजुर केला आहे. या 18 जणांच्यावतीने ऍड. सय्यद अरिबोद्दीन, ऍड. येरावार, ऍड. डी.व्ही. कुलकर्णी, ऍड.श्रीकांत गाडगे, ऍड. ऋषीकेश गोगरोड, ऍड. साईनाथ शंकपाळे, ऍड. नयुम खान पठाण यांनी बाजू मांडली होती.
पोळ्याच्या दिवशी बिलोलीत झालेल्या हाणामारी प्रकरणात 18 जणांना जामीन