नांदेड(प्रतिनिधी) -एका 74 वर्षीय व्यक्तीच्या अडाणी पणाचा फायदा घेवून त्यांच्या बॅंक खात्यातील 3 लाख 50 हजार रुपये दोन जणंानी लंपास केले आहेत.
नागेश नागोराव कदम (74) रा.लघळूद ता.भोकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भोकर शहरातील दत्ता अमृता भंडारे आणि अमृता भंडारे या दोघांनी 13 जुलै 2017 ते 20 सप्टेंबर 2021 दरम्यान त्यांच्या अशिक्षीत अडाणी पणाचा फायदा घेवून बचत खात्यावर बनावट मोबाईल नंबर बॅंकेच्या अकाऊंटवर भरून फोन पे द्वारे 3 लाख 50 हजार रुपये काढून घेतले आहेत. भोकर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 353/2021 कलम 420, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दिगंबर पाटील हे करीत आहेत.
अशिक्षीत व्यक्तीचे 3 लाख 50 हजार रुपये बॅंकेतून काढून घेतले