नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथील एका डॉक्टरांचा 40 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला आहे. सोबतच प्राथमिक शाळा तरोडा (बु) येथून शाळेचे तीन शिक्के चोरण्यात आले आहेत.
डॉक्टर साईनाथ गंगाराम वाघमारे हे यश हॉस्पीटल भोकर येथे डॉक्टर म्हणून काम करतात. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजेच्यासुमारास ते आपल्या दवाखान्यात काम करत असतांना गर्दीचा फायदा घेवून त्यांनी टेबलच्या ड्रॉपमध्ये ठेवलेला 40 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी चोरट्यांनी काढून घेतला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
गंगाधर रामचंद्र तोडे हे तरोडा (बु) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. 17 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 ते 18 सप्टेंबरच्या सकाळी 6 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयाचे कुलूप वाकवून शाळेचे तीन शिक्के 750 रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कंधारे अधिक तपास करीत आहेत.