लोहा येथे 1 लाख रुपये चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानक लोहा येथे बसमध्ये प्रवेश करतांना एका व्यक्तीचे एक लाख रुपये चोरट्यांनी काढून घेतले आहेत. तसेच शिवाजीनगर येथील विश्रामगृहात एका व्यक्तीच्या खिशातून वंचित बहुजन आघाडीचे लेटर पॅड आणि   2 हजार रुपयांची कॅरीबॅग चोरीला गेली आहे.
मधूकर माणिका पांचाळ हे 23 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता लोहा बसस्थानकातील बसमधून उतरून उघू शंकेसाठी गेले आणि परत बसमध्ये प्रवेश करतांना त्यांच्या शर्टच्या डाव्या खिशातील 1 लाख रुपये कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहेत. लोहा पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.
साहेबराव शंकरराव बळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 सप्टेंबरला दुपारी 12 ते 2 या वेळेत ते विश्रामगृहातील कॅन्टीनमध्ये चहा पिऊन विश्रामगृहाबाहेरील सिमेंट खुर्चीवर बसले असतांना त्यांची नजर चुकवून त्यांची कॅरीबॅग कोणी तरी चोरली. या कॅरीबॅगमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लेटरपॅड आणि 2 हजार रुपये रोख रक्कम होती. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शेख इब्राहिम अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *