नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या नेतृत्वात पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली.[the_ad id=”2691″]
आज जिल्हाभरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होती आणि आजच पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती आहे. या पार्श्वभुमिवर पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्यासह जिल्हाभरासह सर्व पोलीस उपअधीक्षक, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, विविध शाखांचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी तसेच जनसंपर्क विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे यांची उपस्थिती होती.[the_ad id=”2689″]
पोलीस अधीक्षक कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी