नांदेड,(प्रतिनिधी)- एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ४२ वर्षीय अनोळखी माणसाचा मृत्यू झाला आहे.सोनखेड पोलिसांनी याबाबत शोध पत्रिका जारी केली आहे.सोनखेडचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी जनतेला आवाहन केले आहे की,कोणी या मयत अनोळखी माणसास ओळखत असेल तर सोनखेड पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती द्यावी.
दिनांक २३ सप्टेंबर रोजी एक ४२ वर्षीय अनोळखी माणसास कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.हा अनोळखी मयत पुरुष नांदेड सिडको ढवळे कॉर्नर ते लातूर जाणाऱ्या रस्त्यावर मयत अवस्थेत सापडला आहे. त्याबाबत सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५८/२०२१ कलम २७९,३०४(अ) भारतीय दंड संहितेनुसार दाखल झाला आहे.
मयत पुरुष अद्याप अनोळखी आहे.त्याच्या नातेवाईकांचा शोध लागावा म्हणून सोनखेड पोलिसांनी शोध पत्रिका जारी केली आहे.मयत अनोळखी पुरुष अंदाजे ४२ वर्षीय आहे.त्याचा बांधा सडपातळ आहे.उंची अंदाजे १७० से.मी.आहे.रंग सावळा आणि केस बारीक उभे आहेत.त्याच्या छातीवर तीळ आहे.त्याने परिधान केलेला पोशाख मळकट निळसर पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचा फुल प्यांट आहे.अश्या वर्णनाच्या अनोळखी मयत पुरुष माणसास कोणी ओळखत असेल तर त्यांनी सोनखेड पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दयावी असे आवाहन महादेव मांजरमकर यांनी केले आहे.माहिती फोन क्रमांक ०२४६६ २४५०३३,तपास अधिकारी भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३३७३४९५ यावर सुद्धा देता येईल.