पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा शासनास प्रस्ताव

महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत नवीन 11 आजारांचा समावेश करा
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक संजय पांडे हे आपल्या अधिकारी आणि अंमलदारांची किती काळजी घेतात याचे एक उदाहरण नव्याने समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेमध्ये कांही आजारांचा समावेश होण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील अपर मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्राला 2005 ते 2020 दरम्यानचे तीन संदर्भ जोडले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेमध्ये कांही नवीन आजारांचा समावेश करण्याचा प्रस्ताव दिला आहे.महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेमध्ये आज 39 आजारांना उपचार दिला जातो.
महाराष्ट्र दलातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार सतत विविध बंदोबस्तात तैनातीला असतात. त्यांना आपल्या विहित कालखंडापेक्षा जास्त काम दररोज करावे लागते. सोबतच अनेकदा अस्वच्छ अशा भागात नोकरी असते. आहार वेळेवर मिळत नाही तरीपण आल्या कुटूंबापासून दुर राहून ते आपले कर्तव्य बजावत असतात. वेळोवेळी उघड्यावरील अन्न पदार्थ खातात. या सर्व घटनाक्रमाचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यासाठी त्यांना वैद्यकीय सुविधा त्वरीत मिळाव्यात याची आवश्यकता असते.
सन 2007 पासून राज्य शासनाकडे डेंगू,पीआयडी संबंधीत शस्त्रक्रिया, हायस्टर टॉमी सर्जरी हे आजार आरोग्य योजनेत सामील करण्यासाठी प्रतिक्षारत आहेत. तसेच सन 2019 पासून मधुमेह आणि त्या पासून उदभवणारे आजार तसेच गॅंगरीन व इतर अवयव नाश होेणे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. सोबतच 2020 पासून अस्थमा, दमा ऍटक, मायग्रेन, हार्पीस, नागीन, स्वाईन फ्ल्यू, स्क्रॅबटायपुस, हीपेटायटीस, पॅरल्यासीस, फिट, सर्व वातविकार, सिकलसेल, सर्व त्वाचा विकार, शारीरिक विकृती, मान, कंबर, गुडगा यातील हाडांचे आजार आणि पोटाचे सर्व आजार या आजारांना आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तसेच याच वर्षात ऍपलॅस्टीक ऍनीमियॉ, कोरोनानंतर होणारा म्युकर मायकोसीस (ब्लॅक फंगस)या रोगांचा सुध्दा प्रस्तावात समावेश आहे.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रस्तावांमध्ये नव्याने कांही आजारांचा समावेश व्हावा असे या पत्रात लिहिले आहे. ज्यामुळे पोलीस विभागातील अधिकारी आणि अंमलदारांची शारिरीक सक्षमता वृध्दीगंत होईल आणि ते आपल्या कर्तव्यावर चांगली कामगिरी करतील. यासाठी या सर्व आजारांचा त्यात समावेश व्हावा असे या पत्रात लिहिले आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी 11 नवीन आजारांचा समावेश या यादी व्हावा असा प्रस्ताव पाठवला आहे. ज्यामध्ये ऍबेक्स विथ सेप्टीकमिया, हेपेटायटीस, ट्युबर कॅलोसिस, हायड्रोक्लिन, सर्व प्रकारच्या हरणीया, पोस्टेड डीसीसी, कॅफेट्रॅक, डीपव्हेन थ्रोबोसेस, मेनो राहाजिया, युट्रीन फायब्रोड, ऍक्सेसीव्ह ब्लीडींग असे ते आजार आहे. या सर्व आजारांचा महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत लवकरात लवकर समावेश करावा असे संजय पांडे यांनी अपर मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *