नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील जुन्या पिढीतील महिला शकुंतला गोविंदराव परळकर यांचे निधन झाले. आज 27 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर जुना मोंढा येथील राम घाटावर अंतिमसंस्कार करण्यात आले.
जुने नांदेड येथील किल्ला रोडवर राहणाऱ्या शकुंतला गोविंदराव परळकर (90) यांचे काल रविवार दि.26 सप्टेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. आज 27 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर जुना मोंढा येथील रामघाट येथे अंतिमसंस्कार करण्यात आले. आज सकाळी त्यांची अंतिम यात्रा गणेशनगर,नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानातून निघाली. त्यांच्या पश्चात सुभाष परळकर, ऍड.आर.जी.परळकर, दत्तात्रय परळकर या मुलांसह सुना, नातू, पणतू, नात सुना असा मोठा परिवार आहे. रामघाटावर अनेक वकील मंडळी, परळकर कुटूंबियांचे हितचिंतक अशा अनेक जणांनी त्यांना शेवटचा निरोप दिला.
ऍड. आर.जी. परळकर यांना मातृशोक