एमएसएमआरएचा भारत बंदला पाठींबा

नांदेड(प्रतिनिधी)-वैद्यकीय औषधी विक्री संघटनेने सुध्दा संयुक्त किसान मोर्चाच्या हाकेला प्रतिसाद देत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमक्ष आज धरणे आंदोलन करून भारत बंदमध्ये सहभाग घेतला.
महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना ही कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचा एक घटक आहे. या संघटनेने 27 सप्टेंबरच्या भारत बंद हाकेला प्रतिसाद दिला आहे. सरकारने संसदेतील पाशवी बहुमताचा वापर करून 44 कामगार कायदे मोडीत काढले. त्यामुळे देशातील कामगार गुलाम बनणार आहेत. हे भविष्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. आज शेतकऱ्यांसोबत आम्ही भारत बंदमध्ये सहभागी होवून त्यांना पाठींबा देत आहोत. शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत. शेत मालाला हमी भाव देणारा कायदा करावा नवीन कामगार संहिता रद्द करावी, पेट्रोल, डीझेल आणि गॅस वरील कर कमी करावेत. वीज वितरण खाजगीकरण कायदा रद्द करावा असे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर एमएसएमआरए नांदेडचे जमालोद्दीन सिद्दीकी यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *