नांदेड,(प्रतिनिधी)- भोकर मधील भांडण सुरु झाले हटकर आणि नर्तावार कुटुंबात आणि त्याची झळ भोकर पोलिसांना देण्याची सुपारी घेतली गेली.सुरु झाले मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण.आता नर्तावार कुटुंबाविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.अर्थात समस्या वाढल्या आहेत.आता ही अट्रॉसिटीची तक्रार पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी स्वाक्षरीत केली नाही, त्यावर स्वाक्षरी साहेब मोरे यांची आहे.नर्तावार कुटुंबाच्या बातम्यांनी विकास पाटील यांच्या जीवनात किती कहर झाला असेल ना ! त्याबाबत त्यांनी कोठे दाद मागायची हा प्रश्न आणि त्याचे उत्तर खूप अवघड आहे.
५ सप्टेंबर पासून सुरु झालेले प्रकरण आता जातीवाचक शब्दांवर आले आहे.एका अपघातानंतर सुरु झालेले प्रकरण पुढे हाणामारी,पोलिसांवर आरोप असे वळले.त्यानंतर पोलिसांवर वयक्तिक आरोप करण्यात आले.त्याला आरोपांना सत्याचा मुलामा देण्याची सुपारी काही जणांनी घेतली.सध्या आपले सत्य पटवून देण्यासाठी उषाताई नर्तावार काही फटाक्यांसोबत मुंबईला आझाद मैदान येथे उपोषण करीत आहेत.पहा कसे बदलले प्रकरणाला.अगोदर अपघात,अपघातात अनोळखी गाडी,नंतर नर्तावार कुटुंबातील एका युवकाचे नाव,पुढे महिलेला लज्जा येईल असे शब्द बोलल्याचा पोलिसांवर आरोप आणि आता मुंबईला उपोषण सुरु, कोण आहे प्रायोजक या उपोषणाचा यासाठी शोध सुरूच आहे.त्यांची पण नावे समोर येतीलच.
भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे सार्वजनिक,वयक्तिक आणि कौटुंबिक प्रताडना करण्याचा कायदेशीर अधिकार आहे काय कोणाला ? आपल्या जीवनातील समस्येला इतरांच्या हातात दिले तर काय काय होऊ शकते याचा परिणाम आपल्यावरच होतो.असा हा प्रकार सुरु झाला आहे.विकास पाटील यांनी आपल्या जीवनात सुरु झालेल्या वावटळाला कोणापुढे मांडावे याची विवंचना त्यांना सतावत आहे,कारण तोंड दाबून बुक्क्यांचा मार हा प्रकार पोलीस खात्यात ते मागील ३० वर्षांपासून पाहत आहेत.असो.
या भोकर प्रकरणाला आता अट्रॉसिटी कायद्याची झालर लागली आहे.काल दिनांक २८ सप्टेंबर रोजी भोकर पोलीस ठाण्यात साहेब हरी मोरे वय 43 रा.महात्मा गांधी नगर भोकर यांनी स्वाक्षरी करून दिलेल्या तक्रारीनुसार उषाताई सुरेश नर्तावार, दिनेश सुरेश नर्तावार,विक्की ऊर्फ विशाल सुरेश नर्तावार, आरोही ऊर्फ सुषमा नर्तावार सर्व रा, भोकर यांनी ५ सप्टेंबर २०२१ ते आज पर्यँत त्याचे कुंटुबीयांची महाराष्ट्रभर धिंड काढण्याच्या व बदनामी करण्याचे उद्देशाने बँनरवर समाज कंठक हा शब्द वापरुन व्हाँटसअप , फेसबुक, व सार्वजनिक ठिकाणी इत्यादी सोशल मिडीयावर वायरल करुन तसेच सार्वजनिक ठिकाणी बँनर लावुन त्यांची व कुंटुंबीयाची समाजा मध्ये बदनामी करुन , अपमानीत करुन त्रास देवुन भोकर मधुन हकलुन देण्याचे उद्देशाने त्रास दिला आहे.
भोकर पोलिसांनी साहेब मोरे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक ३५९/२०२१ कलम ४९९,५००,५०५(२), ५०४,५०६,३४ भादवी व सह कलम ३ (1)(r)(u) (z) अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास आता भोकरचे पोलीस उप अधीक्षक गोपाळ रांजणकर यांच्या कडे देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार,पालक मंत्री अशोक चव्हाण आणि पोलीस महासंचालक संजय पांडे या बाबत सत्य शोधतील अशी अपेक्षा आहे.
